राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांचा १६, १७ रोजी सुसंवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता येत्या दि. १६ व १७ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील कोरोना महामारीसंदर्भात विविध राज्ये व संघ प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांवर पोचली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर याबाबत घोषणा करण्यात आली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांशी सुसंवाद साधण्याची १६ रोजी संधी मिळणार आहे.

या संदर्भातील अधिसूचनेनुसार या सुसंवाद कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिला गट पंतप्रधानांशी १६ रोजी चर्चा करणार आहे. तर १७ रोजी पंतप्रधान दुसर्‍या गटातील मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करतील. हा चर्चात्मक कार्यक्रम दु. ३ वा. सुरू होणार आहे.