ब्रेकिंग न्यूज़

रस्ते खोदण्याच्या कामांसाठी सरकारची १५ मे पर्यंत मुदत

स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते यांनी रस्ता खोदण्याची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करावी, असा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी काल दिला.

उत्तर गोव्यातील पावसाळ्यापूर्वीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी घेतला आहे. महानगरपालिका, नगरपालिका, पंचायतींनी गटारांच्या साफसफाईचे काम हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. या साफसफाईच्या कामांचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे.
येत्या १५ मे पासून उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि तालुका पातळीवरील मामलेदार कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी खास नियंत्रण कक्ष सुरू केले जाणार आहेत. हे नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहेत.