रस्ता अपघातांत एप्रिलमध्ये गेले २७ जणांचे बळी

एप्रिल महिन्यात राज्यात झालेल्या रस्ता अपघातात २७ जणांचे बळी गेल्याची माहिती वाहतूक खात्यातील अधिकार्‍यांने दिली. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांत सहा पादचारी व एक सायकलचालकाचा समावेश आहे.

वाहतूक संचालनालयाने तयार केलेल्या आपल्या मासिक अहवालात एप्रिल महिन्यात एकूण २८४ रस्ता अपघात झाल्याचे नमूद केले आहे. ह्या अपघातापैकी २४ अपघात हे जीवघेणे ठरले. त्यापैकी ६ अपघात उत्तर गोव्यात तर १८ अपघात दक्षिण गोव्यात झाले. त्यापैकी १७ अपघातात लोक गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या. ७१ अपघात हे किरकोळ स्वरुपाचे होते. तर अन्य १७३ अपघातात कुणीही जखमी झाले नाहीत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ११ दुचाकीचालक, एक ड्रायव्हर, ६ पादचारी, ७ प्रवासी, एक सायकलचालक व अन्य एकाचा समावेश आहे.
ह्याच काळात वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक खात्याने ४७२६ वाहनचालकांना दंड ठोठावला.