योगाभ्यासात बळजबरी नसावी

  • पंकज अरविंद सायनेकर

जसे मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळते, तरीही त्याची स्वतःची ओळख मीठ म्हणूनच असते, त्याचप्रमाणे मन आणि मनातील विचार यांची अवस्था होते. ह्याला पतंजली ‘परिशुध्दी’ असे म्हणतात.

जेव्हा जाणकार (लेसपळूशी), अनुभव (लेसपळूशव) आणि इंद्रिये (ीशपीशी) वृत्तींपासून निवृत्त होतात, किंवा क्षीण होतात, त्या स्थितीला समापत्ती म्हणतात. समापत्ती म्हणजे स्वीकृती, जे जसे आहे ते स्विकार करणे. जसे की, समुद्र सर्व नद्यांचे, नदीपात्राचे पाणी स्विकार करतो, आणि त्याहूनही पुढे आम्हाला कळतही नाही की कोणते पाणी कोणत्या नदीचे आहे. आधी म्हटल्याप्रमाणे एकरुप होणे म्हणजे समापत्ती. एक लक्षात घेतले पाहिजे की, आमचे ध्येय वृत्तींचा नायनाट करणे (शीरवळलरींश) नसून त्यांना क्षीण करणे, त्यांचा प्रभाव कमी करणे हा असला पाहिजे. जर का बळजबरी केली, तर तो साधक योगाभ्यास करतोय असे म्हणणे चुकीचे ठरेल. जर का मनातील वृत्ती आपोआप क्षीण होत असतील, विनासायास लोप पावत असतील तर ते चांगले, आणि आमचे ध्येयही तेच आहे.

आपण सर्व गोष्टी करतो… जसे की, चालणे, हसणे, खाणे, झोपणे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा जाणीवपूर्वक (लेपीलर्ळेीीश्रू) होतात त्या स्थितीला सवितर्क समापत्ती/समाधी म्हणतात. उदा. एखादी गाडी घ्या. जेव्हा गाडी म्हटली तेव्हा तिचा रंग, इंधन, इंजिन (िेुशी) इ. गोष्टी आमच्या डोक्यात येतील. किंवा, ह्या गोष्टी म्हणजे गाडी असा आपला समज असेल. जेव्हा आम्ही ‘गाडी’ या विषयावर ध्यान करू आणि वरील गोष्टी न येता, फक्त ‘गाडी’ आणि गाडीवरच ध्यान होईल ती अवस्था म्हणजे समाधी. आधीच्या स्थितीमध्ये तीन घटक होते. शब्द, अर्थ आणि ज्ञान. शब्द जो वाचक आहे जो ‘गाडी’चे प्रतिनिधित्व करतो. त्या गाडीला अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ही गाडी अमुक अमुक कंपनीची आहे. म्हणजेच, त्या शब्दाला अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक ‘गाडी’ म्हणजे एक वाहन आहे, एक साधन आहे जे आपल्याला चलनशक्तीमध्ये मदत करेल. आणि त्याचे गुण, म्हणजे गाडी निळ्या रंगाची आहे, तिला अमुक इंधन लागते, तिचे इंजिन अमुक प्रकारचे आहे इ. वैशिष्ट्ये म्हणजे ज्ञान झाले.
सवितर्क समाधी अवस्था ही सर्वात आधीची स्थिती. समाधी अवस्थांमध्ये वेगवेगळ्या श्रेणी आहेत जसे की, सवितर्क, निर्वितर्क समाधी, सविचार समाधी, निर्विचार समाधी. सवितर्क समाधीमध्ये अपुरेपणा नसतो. निव्वळ शांतता आणि स्थिरचित्तता असते. मनात विचारांचा अभाव असतो.

निर्वितर्क समाधीमध्ये युक्तीवाद, वितर्क नसतात, गोंधळ नसतो. शब्द, अर्थ आणि ज्ञान ही तीनही अंगे नाहीशी होतात. इथे मन, त्या गोष्टीबद्दलचे अनुभव, त्या वस्तूविषयीचे भेदभावयुक्त ज्ञान विसरून जाते. जसे मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळते, तरीही त्याची स्वतःची ओळख मीठ म्हणूनच असते, त्याचप्रमाणे मन आणि मनातील विचार यांची अवस्था होते. ह्याला पतंजली ‘परिशुध्दी’ असे म्हणतात.

स्मृतीचे शुद्धीकरण हे महर्षींनी सूत्रामध्ये सांगितले आहे –
‘स्मृतिपरिशुध्दौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का (यो.द. १.४३)’
आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर का स्मृती शुद्ध नसतील, मनामध्ये रिक्तता येईल. तसेच, जेव्हा स्मृती शुद्ध असतील तेव्हा वस्तू मनाशी एकरूप होईल.
क्रमशः