ब्रेकिंग न्यूज़

यूएसच्या महिला चौथ्यांदा जगज्जेत्या

>> अंतिम सामन्यात हॉलंडवर मात

यूएसच्या महिलांनी अंतिम सामन्यात हॉलंडवर २-० अशी मात करीत फिफा आयोजित महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे पटकाविले. त्यांचे हे चौथे विश्वविजेतेपद होय. तर प्रथमच अंतिम फेरीत धडक दिलेल्या हॉलंडच्या महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

काल झालेल्या अंतिम फेरीत दोन्ही संघ पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीत राहिले होते. दुसर्‍या सत्रात ६१व्या मिनिटाला व्हीएआरच्या आधारे यूएसला पेनल्टी प्राप्त झाली. त्यावर कोणतीही चूक न करता मेगन रापिनोईने प्रतिस्पर्धी हॉलंडच्या गोलरक्षिकेला चकवित संघाचे खाते खोलले. तर ६९व्या मिनिटाला रोझ लावेलने यूएसच्या चौथ्या जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला.