यश फडते उपांत्य फेरीत

>> एशिनय ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप

गोव्याचा १७ वर्षीय युवा खेळाडू यश फडतेने तुषार शाहनीला (भारत) नमवित मकाउ येथे सुरू असलेल्या एशिनय ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धेत अंडर-१९ मुलांच्या विभागाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

यशने तुषारवर ३-० (११-७, ११-९, ११-९) अशी सहज सरळ सेट्‌समध्ये मात केली. उपांत्य फेरीतील प्रवेशामुळे यशचे पदक निश्‍चित झालेले आहे. हे त्याचे या स्पर्धेतील आतापर्यंतचे तिसरे पदक होय. अशी कामगिरी भारताच्या काही मोजक्याच स्क्वॉशपटूंना करता आलेली आहे. यशने यापूर्वी २०१४मध्ये इराणमध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक तर त्यानंतर २०१६त मलेशियात झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले होते.

उपांत्य फेरीत यशची गाठ आता पाकिस्तानच्या हामझा शरिफ याच्याशी पडणार आहे.
दरम्यान, भारताचा अन्य एक खेळाडू वीर चोत्रानी यानेही या स्पर्धेत अंडर-१९ विभागाची उपांत्य फेरी गाठली आहे. वीरने सिंगापूरचा अव्वल मानांकित खेळाडू सिवोव यी शियान याला ११-७, ६-११, ८-११, ११ -९ आणि ११ -७ असे संघर्षपूर्ण लढतीत पराभूत केले.