म्हादई : कर्नाटकचा साक्षीदार निरूत्तर

म्हादई प्रश्‍नी काल पुन्हा जललवादासमोर सुनावणी सुरू झाली. गोव्याच्या पथकाने साक्षीदार ए. के. बजाज यांना विविध प्रश्‍न विचारले असता त्यांनी गोंधळलेल्या अवस्थेत उत्तरे देताना चुकीची व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी माहिती दिली. त्यामुळे पहिल्याच दिवशी कर्नाटकाचा साक्षीदार अपयशी ठरला.
२००३ सालातील केंद्रीय जल आयोगाचा अहवाल यांच्यातील पावसाची आकडेवारीबाबत विचारले असता साक्षीदार गोंधळला. म्हादई खोर्‍यातील पावसाबाबतही साक्षीदार निरुत्तर झाला. नदीची लांबी ११७ किलो मीटर असल्याचे जी माहिती दिली आहे ती कोणत्या आधारावर असे विचारले असता साक्षीदाराने निरर्थक उत्तर दिले. सरकारी अहवालावर आधारित ही आकडेवारी दिल्याचे नमुद केले. वारंवार तफावत दर्शवणारी उत्तरे दिल्याचे लवादाच्याही लक्षात आले.