मोदी सरकारचे १०० दिवस ः भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब!

  • हरसिम्रत कौर बादल
    केंद्रीय मंत्री

‘मोदी २.० सरकार’ चे पहिले १०० दिवस एक अशा आकांक्षी भारताचे प्रतिबिंब आहे, जे दूरदर्शी आणि निडर पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपली पूर्ण क्षमता मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात एक ‘निर्णायक सरकार’ चा मार्ग प्रशस्त करुन ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ सुनिश्चित करीत आहेत.

मी ङ्गार अभिमानाने सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्याविषयी लिहित आहे. खरे तर पहिल्या १०० दिवसांचा कालावधी हा अतिशय आल्हाददायक असतो, कारण पहिल्या १०० दिवसांत सरकारही ङ्गार सक्रिय असत नाही आणि जनतेलाही वाटते की, सरकार ङ्गार मोठे निर्णय घेत नाही. साधारणपणे, जेंव्हा सरकार दुसर्‍या वेळी सत्तेत येते, त्यावेळी नव्या सरकारचा दृष्टीकोन ‘अरे वा’ असा असतो. यापूर्वी आम्ही हे पाहिले आहे. अशा वेळी मनात हाच विचार असतो की, आम्ही निवडणूक जिंकली आहे, एवढी काय घाई आहे आता. आता पुढची पाच वर्षे सत्ता आमच्याच हाती असणार आहे. पण, हा झाला भूतकाळ.

नरेंद्र मोदी- ज्यांनी पंतप्रधानपदी कार्यरत असताना आणि निवडणुकीनंतर एकाही दिवसाची सुट्टी घेतली नाही. वास्तविकता तर अशी आहे, पाचव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाला नव्या सरकारच्या १०० दिवसांवर पूर्ण तन्मयतेने काम करण्यास सांगितले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘राष्ट्र प्रथम’ या सूत्रानूसार कार्यभार सांभाळला. पहिल्या १०० दिवसांमध्ये सरकारने सिद्ध करुन दाखवले की, ‘ जे बोलले जाते, ते प्रत्यक्ष कृतीतून करुन दाखवले जाते, तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी ठोस राजकीय इच्छाशक्तीचेही दर्शन घडवले, जे पूर्वी अशक्य मानले जात होते.

नव्या सरकारच्या पहिल्या संसद अधिवेशनात नेतृत्वाची निर्णायक क्षमता दिसून आली. सरकारने पहिल्याच आठवड्यात मोठा विरोध असतानाही ‘तिहेरी तलाक’ समाप्त करुन महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवण्याप्रती आपली कटिबद्धता दाखवून दिली. या कायद्याने भारतीय राज्यघटनेतील ‘स्त्री-पुरुष न्याय’ सुनिश्चित करुन मुस्लीम महिलांची सुरक्षा आणि सबलीकरण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. बाल लैंगिक अपराध संरक्षण (संशोधन) विधेयक, २०१९ साठी ऐतिहासिक कायदा करुन, ज्या माध्यमातून बालकांवरील लैंगिक हल्ल्यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे, यातून या सरकारचा सामाजिक सुधारणांकडे असलेला कल दिसून येतो, हे एक अनुपम उदाहरण आहे. भारतातील बालकांना आपली सुरक्षा सुनिश्चित करण्याचा हक्क आहे. एका अशा कायद्याच्या माध्यमातून त्यांना संरक्षण मिळते, ज्यातून लैंगिक अपराध करणार्‍याला कठोर शिक्षा मिळते.

शेतकर्‍यांच्या मुद्याविषयी म्हणाल तर, या सरकारच्या प्रगतीशील विकास योजनेच्या केंद्रस्थानी शेतकरी आहे. या सरकारकडून घेतलेल्या प्रथम निर्णयात ‘प्रधानमंत्री सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा लाभ सर्व शेतकर्‍यांना आणि योजनेची व्याप्ती वाढवण्याचा समावेश होता. विस्तारित योजनेत आता सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ सुमारे २० कोटी शेतकर्‍यांना होणार आहे. प्रत्येक शेतकर्‍याला ६,००० रुपयांची मदत आणि मजूर, लहान व्यापारी आणि शेतकर्‍यांना पेन्शन योजनांच्या कक्षेत आणून ‘मोदी २.०’ सरकारने मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे आणि त्यांना समान संधी देण्याचे प्रयत्न केले आहेत.

‘आयुष्मान भारत’ मुळे ५० कोटी लोकांना प्रति परिवार ५ लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे, ज्यातून त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या गरजा योग्यरित्या पूर्ण होतील. यामुळे युवक आणि गरीब सर्वजण मिळून ‘नव भारत’ साकारतील आणि मनुष्यबळाचा वापर होईल. एक असा भारत, जो निश्चितपणे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साकारू शकेल.

तसे तर विरोधी पक्ष आमच्यावर १.३ अब्ज लोकांच्या अपेक्षा नव्या उंचीवर नेल्याचा आरोप करु शकतील, पण याचा आम्हाला अभिमान आहे. ‘मोदी २.०’ चे लक्ष्य एक असा परिवर्तनाचा कालखंड निर्माण करुन नवे मैलाचे दगड, लक्ष्य आणि विकासाचे लाभ सुनिश्चित करुन भारताची ऊर्जा चारी दिशांना ङ्गैलावणे हा आहे, जो एक जागतिक महासत्तेच्या रुपाने भारताला पुढे नेईल. या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आमच्या सरकारची त्रिस्तरीय रणनिती आहे. एक, नव्या भारताला ठोस स्वरुप प्राप्त करुन देण्यासाठी मनुष्यबळाचा योग्य वापर, दोन, भ्रष्ट अधिकारी आणि लोकांवर ठोस कारवाई करुन भ्रष्टाचार संपवणे आणि तीन, पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे.

आम्हाला माहित आहे की, भ्रष्टाचार हा प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. ‘मोदी १.०’ च्या कार्यकाळात स्वच्छ सरकार सुनिश्चित करुन ‘मोदी २.०’ ने भ्रष्टाचार्‍यांविरोधात कारवाईसाठी लक्ष्य निश्चित केले आहे. अशा मोठ्या नोकरशहांना जबरदस्तीने सेवानिवृत्त केले जात आहे, जे आतापर्यंत भ्रष्टाचार विरोधी कायद्यातून स्वतःची सुटका करुन घेत होते आणि आपले खिसे भरत होते. सरकारी तिजोरी लुटणारे आता तुरुंगात आहेत. भ्रष्ट अधिकार्‍यांना हटवण्याचे काम जोरात सुरु आहे. यामुळे भारताला आपल्या आर्थिक क्षमतेचा पूर्ण वापर करुन पुढे जाता येईल.
आम्ही एकीकडे आमची आश्वासने पूर्ण करीत आहोत, तर दुसरीकडे, जागतिक पातळीवर जसे जी-७, जी-२०, ब्रिक्स, संयुक्त राष्ट्र संघटना यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताची मजबूत उपस्थिती आमच्या देशाची वाढती उंची आणि महत्त्व प्रतिबिंबित करते. भारत आता केवळ एक दर्शक वा अनुयायी नाही, तर एक वैश्विक नेता आहे. मग ते पर्यावरण संरक्षण, कर्ब उत्सर्जन, व्यापार, वा शक्ती संतुलन असो, भारत जागतिक शक्तीचे अभिन्न अंग बनला आहे. ‘मोदी २.० सरकार’ चे पहिले १०० दिवस एक अशा आकांक्षी भारताचे प्रतिबिंब आहे, जे दूरदर्शी आणि निडर पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपली पूर्ण क्षमता मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात एक ‘निर्णायक सरकार’ चा मार्ग प्रशस्त करुन ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ सुनिश्चित करीत आहेत.