ब्रेकिंग न्यूज़
मोठ्या आतड्याचा व गुद भागाचा कर्करोग

मोठ्या आतड्याचा व गुद भागाचा कर्करोग

आता आपण पाहूयात की कोलोरेक्टल कॅन्सरचे निदान कोणकोणत्या चाचण्या करून केले जाते. ह्यालाच स्क्रिनिंग असे देखील वैद्यकीय परिभाषेत म्हणतात.
मोठ्या आतड्यातील ऍडिनोमॅटस पॉलिप्स हे जर समजल्यावर लगेच काढून टाकले तर पुढे होणारा कोलोरेक्टल कॅन्सर टाळता येतो. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कर्करोगाची कोणतीच लक्षणे आढळत नाहीत त्यांच्यात योग्य पाठपुरावा केल्यास मोठ्या आतड्याचा कर्करोग स्थानिक अवस्थेत असतानाच कळून येतो. हे स्क्रीनिंग प्रामुख्याने अशा व्यक्तीमध्ये महत्वाचे ठरते ज्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांमध्ये अशा प्रकारचा कर्करोग पूर्वी आढळून आला आहे. ह्याच व्यक्तींमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
मोठे आतडे व गुदभाग ह्यातील कर्करोगाची प्राथमिक तपासणी करताना बोटाचा वापर करून कर्करोगाच्या गाठीची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे जर संडास करताना त्यातून रक्त जात असेल तर त्याला अर्वाचीन वैद्यकीय भाषेत ‘ऑकल्ट ब्लड टेस्ट’ असे म्हणतात. तेदेखील तपासून पाहावे लागते. ज्या पुरुषांचे परीक्षण हे प्रोस्टेट कॅन्सरचे निदान करण्यासाठी केले जाते तसेच ज्या स्त्रियांच्या गर्भाशयाचे अथवा योनी मार्गाचे परीक्षण केले जाते त्या सर्वांमध्ये बोटांचा वापर करून गुद परीक्षण करून ‘रेक्टल ट्यूमर’ नाही ना, ह्याचे शंका निरसन करून घेणे आवश्यक ठरते. पण ह्यात देखील जर हा ट्यूमर गुद भागापासून बराच वरच्या बाजूला असला तर मात्र तो बोटांना तपासताना लागणार नाही. बरेचदा संडासमध्ये रक्त नसताना देखील त्या व्यक्तीला कोलोरेक्टल कॅन्सर असल्याचे आढळून आले आहे. हा
ज्या व्यक्तींच्या मलामध्ये रक्त आढळते ते दरवर्षी न चुकता सिग्मॉइडोस्कोपी, कोलोनोस्कोपी ह्या तपासण्या करून घेतात आणि ह्यात त्या लोकांना प्रचंड त्रास सहन कराव लागतो. बरे एवढे सर्व खर्च करूनदेखील ज्या काही व्यक्तींचे निदान कर्करोग असे होते, त्यांच्या संडासमध्ये असलेल्या रक्ताची देखील तपासणी केली तरी त्यांचे योग्य निदान होऊन त्यांचे आयुर्मान वाढले तर ह्या सर्व चाचण्या करण्याचा उद्धेश सफल झाला असे म्हणता आले असते. पण तसे काही घडत नाही.
मग संशोधकांनी एक नवीन चाचणी करून पाहण्याचे ठरवले. त्यांच्या मते मोठ्या आतड्यातील श्लेष्मल कला ही वाढते आणि त्यात काही विकृत बदल घडून त्याचे ऍडिनोमॅटस पॉलिप्स बनतात आणि त्यात परत काही विकृत बदल परमाणु पातळीवर घडतात आणि त्याचे रुपांतर कर्करोगात होते. तेव्हा त्या संशोधकांनी काही ठराविक व्यक्तींच्या गटाचे मलातील ऊछAचे परीक्षण करून त्यात काही अनैसर्गिक परिवर्तन झाले आहे का ते तपासून पहिले की कर्करोगाची पूर्व अवस्था किवा खरोखरच कोलोरेक्टल कॅन्सर त्या व्यक्तींना झाला आहे की नाही हे समझते का ते पाहण्यासाठी. हे परीक्षण सुमारे ४००० व्यक्तींच्या संडासाचे ह्या प्रकारे परीक्षण करण्यात आले ज्यांना कोलोरेक्टल कॅन्सरचे कोणतेही लक्षण जाणवत नव्हते. त्याच व्यक्तींचे पुन्हा कोलोनोस्कोपी केली गेली तसेच त्यांची फिकल ऑक्लट ब्लड टेस्ट केली गेली. पण शास्त्रज्ञांना षशलरश्र ऊछA टेस्ट करून म्हणावे तसे खात्रीचे रिपोर्ट न मिळाल्याने पुढे हि चाचणी करण्यात त्यांनी फारसा रस घेतला नाही.
हल्ली कोलोरेक्टल कॅन्सरचे निदान करण्यासाठी बर्‍याच रेडिऑलॉजिकल इमेजिंग टेस्ट केल्या जातात. त्यात बेरीअम एनिमा, एन्डोस्कोपी, सीटी स्कॅन, व्बर्च्यअल कोलोनोग्राफी, सिग्मॉइडोस्कोपी… अशा अनेक तपासण्यांचा समावेश आहे. पण ह्या सर्व चाचण्यांमध्ये योग्य व लवकर निदान करण्यासाठी कोलोनोस्कोपी ही सर्वात श्रेष्ठ आहे.
कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणे :
ह्यात गाठ ज्या स्थानावर आढळते त्याप्रमाणे लक्षणे बदलत जातात. आन्त्राच्या उजव्या भागातून प्रवास करताना मल हा पातळ असतो. आन्त्राच्या लरशर्लीा व वर चढणारा आंत्र ज्याला असेंडिंग कोलॉन म्हणतात ह्यात निर्माण झालेली गाठ ही मोठी असते व ती त्या भागात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करत नाही. तसेच त्या व्यक्तीच्या संडासला जाण्याच्या सवयी देखील बदलत नाहीत. उजव्या बाजूच्या आन्त्रातील कर्करोगग्रस्त भागावर व्रण किंवा जखमा निर्माण होतात कारण, ह्या भागातून न जाणवणारा असा आंतरिक रक्तस्त्राव होतो जो बाहेर पडणार्‍या मलाचा रंग मात्र बदलत नाही असेंडिंग कोलॉनमध्ये गाठ असणार्‍या रुग्णांमध्ये अशक्तपणा, धडधडणे तसेच छातीत दुखणे ही लक्षणे असतात. ह्यात अधून मधून होणार्‍या रक्तस्त्रावामुळे मल परीक्षणात ऑकल्ट ब्लड आढळून येतेच असे नाही. पण नकळत होणार्‍या रक्तस्त्रावाने जर एखाद्या व्यक्तीला पांडू अर्थात ऍनिमिया झाला असे कळले तर मात्र त्या व्यक्तीची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. ह्यात संपूर्ण आन्त्राची एन्डोस्कोपी व रेडिओग्राफी द्वारे तपासणी करावी.
आडव्या अर्थात तिरक्या कोलॉनमध्ये व डिसेंडिंग अर्थात उतरत्या मलाशयामध्ये गाठी ह्या मल पुढे सरकत असणार्‍या भागात अडथळा निर्माण करतात. कारण ह्या भागात मल पोहोचेपर्यंत मलाला घन स्वरूप आलेले असते त्यामुळे ह्यात रुग्णाच्या पोटात वेदना होऊन बरेचदा आन्त्राला छिद्र देखील होऊ शकते.
रेक्टोसिग्मॉइड भागात होणार्‍या कर्करोगात ताज्या रक्ताचा स्त्राव संडास करताना होतो. तसेच त्या व्यक्तीला कायम संडास नीट झाला नाही अशी भावना सतावत असते. त्यामुळे निर्माण होणारा मलाचा आकार हा अरुंद व निमुळता होतो. क्वचित रक्ताची कमतरता होऊन ऍनिमियादेखील होतो. ह्या सर्व लक्षणांमुळे रुग्णाचा व डॉक्टरचा असा समज होऊ शकतो की त्याला मुळव्याध झाली आहे. पण इथे त्या व्यक्तीच्या संडासच्या बदललेल्या सवयी लक्षात घेणे गरजेचे असते. तसेच गुद भागातून होणार्‍या रक्तस्त्रावाचे निदान करण्यासाठी गुद भागाचे परीक्षण डॉक्टरांनी बोटाने करून पाहणे गरजेचे असते.