ब्रेकिंग न्यूज़

मृतदेह गायबप्रकरणी डॉक्टरचा जामीन अर्ज निकालात

पणजी (प्रतिनिधी)
बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागारातून यानूझ गोन्साल्विस या युवकाचा मृतदेह गायब प्रकरणी फॉरेन्सिक विभागाचे निलंबित प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रीगीस यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज निकालात काढण्यात आला. या प्रकरणी डॉ. रॉड्रीगीस यांच्या अटकेची गरज भासल्यास क्राईम ब्रँचने त्यांना ४८ तासांची सूचना द्यावी, असा आदेश न्यायालयाने काल दिला. क्राईम ब्रँचने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी डॉ. एडमंड यांना समन्स बजावले होते. त्यामुळे डॉ. एडमंड यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.