ब्रेकिंग न्यूज़
मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची घेतली अर्थसंकल्पपूर्व बैठक

मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची घेतली अर्थसंकल्पपूर्व बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याची अर्थसंकल्पपूर्व खास बैठक काल घेतली.
या बैठकीला मुख्य सचिव परिमल राय, सचिव, आयएएस, आयपीएस, आयएङ्गएस आणि राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून आगामी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या ६ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.

आगामी वर्ष २०२० – २०२१ या आर्थिक वर्षासाठी विकास योजना आराखडे तयार करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.