ब्रेकिंग न्यूज़

मुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांना उद्या दिल्लीत पाचारण

पणजी (न. प्र.)
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्याकडील खाती पुढील आठवड्यात मंत्र्यांना वाटणार असून या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना उद्या दि. १२ रोजी नवी दिल्लीतील एम्स इस्पितळात बोलावले आहे.
बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याबरोबरच आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मंत्री बाबू आजगावकर, महसूल मंत्री रोहन खंवटे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर, गृहबांधणी मंत्री जयेश साळगावकर, मंत्री मॉविन गुदिन्हो, नीलेश काब्राल व मिलिंद नाईक या सर्व मंत्र्यांना पर्रीकर यांनी भेटण्यास बोलावले आहे.