ब्रेकिंग न्यूज़

मुख्यमंत्री दिल्ली दौर्‍यावर रवाना

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्ली दौर्‍यावर काल रवाना झाले असून १४ ते १६ जून दरम्यान ते नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे. दिल्ली दौर्‍यात मुख्यमंत्री १५ जूनला होणार्‍या नीती आयोगाच्या बैठकीत सहभाग घेतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.