ब्रेकिंग न्यूज़

मिराझ, रुबेलला वगळले

अफगाणिस्तान व झिंबाब्वे यांचा समावेश असलेल्या टी-ट्वेंटी तिरंगी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बांगलादेशने ऑफस्पिनर मेहदी हसन मिराझ व वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन यांना वगळले आहे.

अष्टपैलू आरिफूल हक, मध्यमगती गोलंदाज अबू हैदर, फिरकीपटू नझमूल इस्लाम व फलंदाज मोहम्मद मिथुन यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध मागील वर्षी खेळलेल्या संघाचा हे खेळाडू भाग होते. युवा जलदगती गोलंदाज यासिन अराफात व डावखुरा फिरकीपटू ताईजुल इस्लाम यांचा प्रथमच टी-ट्वेंटीसाठी विचार करण्यात आला आहे.

केवळ एका टी-ट्वेंटीनंतर बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेल्या अफिफ हुसेन व मेहदी हसन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. फलंदाज सब्बीर रहमान व अष्टपैलू मोसद्देक हुसेन यांनादेखील संघाची दारे खुली करण्यात आली आहे. शनिवार १४ सप्टेंबर रोजी होणार्‍या अफगाणिस्तान व झिंबाब्वे यांच्यातील सामन्याने मालिकेला सुरुवात होणार आहे.

बांगलादेश संघ ः शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, सौम्य सरकार, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला रियाद, अफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन, सब्बीर रहमान, ताईजुल इस्लाम, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दिन, मुस्तफिझुर रहमान व यासिन अराफात.