ब्रेकिंग न्यूज़

माद्री बलात्कार प्रकरणी ः मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

त्रिवेंद्रम
केरळमधील माद्रीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील एक महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या फा. कुरिआकोस कट्टुथारा यांचा काल संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या बलात्कार प्रकरणी आरोपी म्हणून अटक झालेले बिशप फ्रँको मुलक्कल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात फा. कुरिआकोस कट्टुथारा हे त्यांच्या घरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडले. त्यांना धमक्या दिल्या जात होत्या असे त्यांच्या कुटुंबियांना म्हटले असून याप्रकरणी माहिती देणारे पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.