महाराष्ट्रात अखेर महायुतीची घोषणा

>> जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अखेर शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा करण्यात आली. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या जाहीर केलेल्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत. मित्रपक्षातील इतर नेत्यांच्या या पत्रकावर सह्या नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाई नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला असून तशी घोषणा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.