महान दुचाकीस्वारा तुला नमस्कार!

महान दुचाकीस्वारा तुला नमस्कार!

हेल्मेट न घालणार्‍या दुचाकीस्वारांना तालांव देण्यासाठी रस्त्याकडेला टपून असलेले पोलीस आपण गोव्यात पाहतो. मात्र या छायाचित्रातील पोलिसदादा आहेत आंध्र प्रदेशमधील अनंतपुर जिल्ह्यातील सर्कल इन्स्पेक्टर शुभकुमार. बायको-मुलांसह पाच जणांना मोटरसायकलवरून आणि तेही हेल्मेट न घालता घेऊन जाणार्‍या या दुचाकीस्वाराच्या साहसाला पोलिसांने नकळत हात जोडून नमस्कार करीत असे न करण्याची विनवणी केली.