मडगावात सहा दुकानांना आग

मडगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळील बहुमजली इमारतीतील सहा दुकानांना काल सकाळी आग लागून करोंडो रुपयांचे नुकसान झाले. आगीत सहाही दुकाने पूर्णपणे खाक झाली. तर वरच्या मजल्यावर अडकून पडलेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांना अग्नीशामक दलाच्या जवानानी सुखरुप खाली उतरविले.

काल सकाळी ९ वाजता लक्की इंटरप्रायझेज या बहुमजली इमारतीतील तळमजल्यावरील लक्की इंटरप्रायझीस, लक्की वर्ल्ड, साई ज्वेलर्स, ममता इलेक्ट्रॉनिक व एका कपड्याच्या मिळून सहा दुकानांना आग लागली व तसेच विजया बँकेच्या एटीएम व इतर सामानाची किरकोळ नुकसानी झाली.

या इमारतीत तळमजल्यावर ही दुकाने दाटीवाटीने असून अग्नी शामक दलाला इतर दुकाने वाचविण्यात यश मिळाले. ही आग विझविण्यासाठी लोकांनीही मदत केली. स्थानिक नगरसेवक दामू नाईक यांनी लोकांचे व अग्नी शामक दलाचे आभार मानले.
आग विझविण्यासाठी मडगाव, वेर्णा व फोंडा येथून पाण्याचे बंब आगल्याचे दलाचे अधिकारी गील सौझ यानी सांगितले. या दुकानांचे किती नुकसान झाले याचा अंदाज मिळाला नसला तरी ५० लाखांपेक्षा जास्ती नुकसान झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. ही शॉर्टसर्किट की घातपात याची पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी दलाने केली आहे.