मडगावात वादळ-पावसाचा फटका ः झाडांची पडझड

मडगावात वादळ-पावसाचा फटका ः झाडांची पडझड

गुरुवारी रात्री ११ वाजता गडगडाट, वादळ व पावसामुळे मल्टिपर्पझ कॉलेजमध्ये मतमोजणीच्या वेळी वीज गेल्याने पत्रकारांना अंधारात राहावे लागले. यावेळी तेथील रस्त्यावरून जाणारे दोन स्कूटरस्वार घसरून पडून जखमी झाले. निवडणूक अधिकार्‍यांनी आपल्या कार्यालयात जनरेटरची व्यवस्था केली होती. पण प्रसारमाध्यमांची खोली मात्र अंधारात होती. तेथे उजेडाची व्यवस्था न केल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, नागोवा, बाणावली येथे वीजखांब कोसळून झाडांवर पडले व तारा लोंबकळू लागल्याने तेथे वीज पुरवठा बंद पडला. राय येथे एका उतरणीवर वाहनांचे डिझेल रस्त्यावरून वाहत गेल्याने सातआठ स्कूटरस्वारांना अपघात झाला. अग्नीशामक दलाला माहिती देताच इंधनावर माती शिंपडून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. याच दरम्यान कित्येक ठिकाणी झाडे कोसळली.