मडगावातून २८०० मजूर श्रमिक रेल्वेने बिहारला रवाना

 

काल रविवारी मडगाव रेल्वे स्थानकावरून बिहार येथील मजुरांना घेऊन दोन श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. त्यातून २८०० मजूर आपल्या गावी रवाना झाले.

काल रविवारी दुपारी २ वाजता एक गाडी मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटली. त्यात १४७४ मजूर होते व सायंकाळी उशीरा दुसरी गाडी सोडण्यात आली. शनिवारी बिहारला दोन गाड्या सोडण्यात आल्या. त्या रेल्वेतून तीन हजार मजूर निघाले. काल सकाळी ७ वाजता पावसाने आपली हजेरी लावली. त्या पावसात आपले सामान डोक्यावर घेवून चालत हे मजूर रेल्वे स्थानकावर निघाले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून रोज मडगाव रेल्वे स्थानक हजारो मजुरांनी गजबजलेले दिसत आहे. त्याचबरोबर शेकडो पोलिसांचा ताफाही दिसत आहे. मजुरांची पाठवणी करण्यासाठी पोलीसही दिवसरात्र राबताना दिसत आहेत.