ब्रेकिंग न्यूज़

भारतीयांच्या विदेशातील संपत्तीवर आता होणार कारवाई

नवी दिल्ली
विदेशात अवैध संपत्ती साठवलेल्या भारतीयांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता प्राप्ती कर खात्याने मोहीम उघडली आहे. प्राप्ती कर खात्याने आता या विभागाच्या विदेशातील समकक्ष विभागाच्या सहकार्याने हजारो भारतीयांच्या विदेशातील संपत्तीची चौकशी सुरू केली असल्याची माहिती प्राप्ती कर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. सीबीडीटीचे संचालक सुशील चंद्रा यांनी याला दुजोरा दिला आहे.