भाजप उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचे नाव आज शनिवारपर्यंत जाहीर होईल, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल सांगितले. पक्षाच केंद्रीय नेते वाराणसीला गेले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास विलंब झाला असे तेंडुलकर म्हणाले.
उत्त्पल की सिद्धार्थ?
दरम्यान, या पोटनिवडणुकीत भाजप पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी देईल की दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्त्पल पर्रीकर यांना याकडे पणजीतील मतदारांबरोबरच संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.