भाजपच्या महासचिवपदी बी. एल. संतोष नियुक्त

भारतीय जनता पक्षाचे नवे महासचिव म्हणून बी. एल. संतोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष सध्या संयुक्त महासचिव (संघटन) म्हणून काम पहात होते. महासचिव म्हणून सुमारे १३ वर्षे कार्यरत असलेल्या रामलाल यांना पुन्हा रा. स्व. संघात पाठविण्यात आल्याने संतोष यांना महासचिवपदी बढती देण्यात आली आहे. आपल्या नव्या पदाचा ताबा ते तातडीने घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे ते अत्यंत विश्‍वासू मानले जातात.