भक्तीने अजिंक्यपद राखले

>> राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा

गोव्याची वुमन ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने कराईकुडी-तामिळनाडू येथील चेत्तिनाड पल्बिक स्कूलमध्ये कॅसल चेस अकादमीतर्फे आयोजित ४६व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ २०१९ स्पर्धेचे अजिंक्यपद यशस्वीरित्या आपल्याकडे कायम राखले.

नवव्या फेरीअंती भक्ती ८.५ गुणांसह आघाडीवर होती आणि तिला जेतेपदासाठी केवळ एक गुणाची आवश्यकता होती. काल झालेल्या दहाव्या फेरीत भक्तीने प्रियांका के. हिला पराभूत करीत पूर्ण एका गुणाची कमाई करीत ९.५ गुणासह जेतेपत निश्‍चित केले. आज शेवटच्या फेरीत तिची लढत वुमन इंटरनॅशनल मास्टर प्रत्युशा बोड्डा हिच्याशी होणार आहे.

वुमन इंटरनॅशनल मास्टर वंतिका अग्रवाल ८ गुणांसह दुसर्‍या स्थानी नंधिधा पीव्ही आणि दिव्या डी. ७.५ गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे.
भक्तीच्या या यशाबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा गोव्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी तिचे अभिनंदन केले आहे.