ब्राझीलहून २५७ गोमंतकीय दाखल

ब्राझील देशात अडकलेले २५७ गोमंतकीय खलाशी शनिवारी रात्री ११.५० वाजता दाबोळी विमानतळावर कतार एअरवेज विमानातून दाखल झाले. या सर्व प्रवाशांना विलगीकरणासाठी कांदोळी, पणजी, मडगाव येथे विविध हॉटेलमध्ये पाठविण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेत अडकलेल्या २९१ भारतीयांना घेऊन दाबोळी विमानतळावर विशेष चार्टर विमान उतरले होते. तर शनिवारी रात्री ११.५० वा. ब्राझीलमध्ये अडकलेल्या २५७ गोमंतकीयांना कतार एअरवेज या विमानातून दाबोळी विमानतळावर आणण्यात आले. रात्री दाबोळी विमानतळावर विमानातील सर्व गोमंतकीय प्रवाशांची रॅपिड चाचणी केल्यानंतर खास कदंब बस गाड्यातून कांदोळी येथील हॉटेल व्हिस्पेरींग पाममध्ये (१००), पणजी पाटो येतील कंट्री सुटस् हॉटेलमध्ये (५६), मडगाव येथील हॉटेल शेख रेसिडेन्सी मध्ये (२५), हॉटेल कॉस्मिक मध्ये (५०) व हॉटेल अन्थूरीयमममध्ये (२५) मिळून २५७ गोमंतकीयांना विलगीकरणासाठी अशा विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.