बाहेर खाण्यासाठी काही पर्याय …

खरं तर घरातलं खाणं केव्हाही उत्तम. पण हल्ली शिक्षण आणि नोकरीमुळे अनेकांना बाहेर खाण्याशिवाय काही पर्यायच नसतो. तेव्हा बाहेरचं खाण्याची वेळ तुमच्यावर येत असेल तर काही गोष्टी आवर्जून करा. तसं बाहेरं खाणं हानिकारकच पण जर पर्याय नसला तर त्यातल्या त्यात काय खाल्लेले चांगले हे माहित असणे गरजेचं आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या आपण टाळू शकतो. त्यामुळे बाहेर खाताना या गोष्टीचा नक्की विचार करा
१. बाहेर खाताना ते अन्न गरम व उकळून बनवलेलं असावं. कारण गरम केल्याने त्यात जंतू असण्याची शक्यता कमी होते. त्यानंतर त्या अन्नपदार्थात अजिनोमोटो नसावं. यामधेही इडली सांबार, डोसा सांबार खाणं उत्तम
२. शक्यतो तळलेले पदार्थ खाणे टाळलेले बरे. कारण अनेकदा वापरलेल्याच तेलाचा पुन्हा वापर केला जातो
३. जर दुपारी किंवा रात्री जेवायच्या वेळेत बाहेर खायची वेळ आली तर चपाती किंवा गव्हाची रोटी सोबत भाजी असे खाता येईल. किंवा एखादा भाताचा प्रकारही चालू शकतो.
४. कोणत्या तरी मधल्यावेळी बाहेर आहात आणि भूक लागली तर फळे खाणे केव्हाही चांगले. फळे बर्‍याचदा सहज उपलब्धही होतात. त्यातही केळ पोट भरणारे असते. फळे नको असतील तर राजगिरा लाडू, वडीही चालू शकेल. खजूरही खाता येतील. गार दूधही हल्ली दुकानांमध्ये उपलब्ध असते. वडा-पाव, सामोसा हे असे खाण्यापेक्षा काकड़ी खाण्याचा शारीराला फ़ायदा होईल व भूकही मरणार नाही.