बारावीचा निकाल आज

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार २६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर केला जाणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर वेबसाईटवर तो उपलब्ध केला जाणार आहे. ७ जुलै पासून गुणपत्रिका विद्यालयात उपलब्ध करण्यात येणार आहेत. ही परीक्षा राज्यातील १७ केंद्रांतून घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण १८,१२१ विद्यार्थी बसले आहेत.