बाबुशवरील आरोप निश्‍चिती २९ ऑगस्टपर्यंत लांबणीवर

>> कथित बलात्कार प्रकरण

येथील उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने पणजीचे भाजप आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्यावरील अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणी आरोप निश्‍चिती २९ ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान, आमदार मोन्सेर्रात यांनी याप्रकरणी दाखल केलेली उच्च न्यायालयातील आव्हान याचिका मागे घेतली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्यावर आरोप निश्‍चित करण्याचा आदेश दिलेला आहे. आमदार मोन्सेर्रात यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांनी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजेरी लावली होती.