पोरस्कडे धोकादायक जंक्शनवर अपघातात स्कूटरस्वार ठार

पोरस्कडे पेडणे येथील माजी सरपंच तथा समाजसेवक बाबी उर्ङ्ग यशवंत तळावणेकर यांचे अपघातात निधन झाल्याची घटना काल दि. १ रोजी सकाळी घडली. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबी तळावणेकर हे ११ वाजता आपल्या दुचाकी जी ए ११ सी ३१३२ या वाहनातून पेडणे मार्गे सावंतवाडी बाजूने जात होते. तर विरुद्ध दिशेने चारचाकी एमएच४३ एएन ४२०० हे वाहन येत होते. पोरस्कडे येथे पोचताच अपघात झाला. तातडीने त्याना गोवा मेडीकल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता सायंकाळी चार वाजता त्यांचे निधन झाले.
हे जंक्शन अत्यंत धोकादायक असून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ताही धोकादायक ठरत आहे , या जंक्शनवरून येणार्‍या जाणार्‍या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यासाठी सरकारने आता या पुढे बळी वाचवण्यासाठी या ठिकाणी वीज, सिग्नल व उड्डाण पूल बांधून गैरसोय दूर करावी अशी मागणी उद्योजक आहे.
उपाययोजनेचे काम रेंगाळले
दरम्यान गेल्या १३जून रोजी याच ठिकाणी कोरगाव येथील पिता-पुत्र अपघातात ठार झाले होते. त्यावेळी यशवंत तळावणेकर यांनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे या धोकादायकय रस्त्याविषयी चर्चा करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याठिकाणी कामाला सुरुवात झाली होती. मात्र अजूनही ते काम अर्धवट राहिले आहे.