पैकुळ सत्तरी येथे युवकाचा बुडुन मृत्यू

पैकूळ-सत्तरी येथील नदीवर सहलीसाठी आलेल्या तरुणांपैकी हजरत अली (वय वर्षे २४, राहणारा पांजरखण कुंकळ्ळी) या युवकाचे नदीत बुडुन निधन झाले. पैकुळ येथील नदीच्या परिसरात सहलीसाठी अठरा जणांचा गट आला होता. सायंकाळी चारच्या दरम्यान हजरत अली हा युवक नदीत बुडाला. त्यामुळे काल सकाळ पासून हजरतची शोध मोहीम वाळपई व फोंडा अग्निशमन दलाकडून जारी करण्यात आली. सकाळी नऊच्या दरम्यान हजरत अलीचा मृतदेह पाण्यात सापडला. घटनेचा पंचनामा वाळपई पोलीसांनी केला आहे.