पु. शि. नार्वेकर, भेंब्रे व देवदत पाटील यांना पुरस्कार

गोवा सरकारचे भाषा पुरस्कार जाहीर झाले असून मराठी साठीचा बा द सातोस्कर भाषा पुरस्कार पु. शि. नार्वेकर यांना,कोकणी साठीचा रवींद्र केळेकर भाषा पुरस्कार उदय भेंब्रे यांना तर संस्कृत साठीचा दुर्गाराम उपाध्ये पुरस्कार देवदत पाटील यांता जाहीर झाला आहे.डॉ सोमनाथ कोमरपंत, दामोदर मावजो व लक्षण पित्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते.