ब्रेकिंग न्यूज़

पीडीए आंदोलनकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न

>> कॉंग्रेसचा आरोप

नगरनियोजन मंडळाने ग्रेटर पणजी पीडीएतून दहा गावे वगळण्याचा निर्णय घेऊन आंदोलन करणार्‍या नागरिकांत फूट पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत काल केला. कॉंग्रेस पक्ष पीडीए, प्रादेशिक आराखड्याविरोधात आंदोलन छेडणार्‍या ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी पीडीएचे अध्यक्षपद भूषविले त्यावेळी पीडीएमध्ये गावांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. लोकांचे पीडीएविरोधात आंदोलन मोडून काढण्यासाठी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केवळ १० गावे वगळली आहेत, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.