ब्रेकिंग न्यूज़

पश्‍चिम बंगालमध्ये ५० बॉम्ब सापडले

पश्‍चिम बंगालमधील भाटपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांकिनारा भागातून जवळपास ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मात्र, सध्या येथील परिस्थिती साधारण असल्याची माहिती पोलीस आयुक्त अजय ठाकूर यांनी दिली. लोकसभा निवडणुकांच्या अगोदरपासूनच भाटपारा परिसर कायम अशांत राहिलेला आहे. रविवारीच या ठिकाणी तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आहे होते. पोलिसांकडून येथील परिस्थिती कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.