ब्रेकिंग न्यूज़

पर्रीकर ८ रोजी परतणार

>> सुदिन ढवळीकर यांची माहिती

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या ८ रोजी गोव्यात परतणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे, हा विरोधकांचा आरोप त्यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना फेटाळून लावला.

मुख्यमंत्र्यांनी कुणाकडे तरी ताबा द्यायला हवा होता असे विरोधकांचे म्हणणे आहे असे त्यांना सांगितले असता पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात हुशार मंत्री आहेत. त्यांना सर्व खात्यांची माहिती व ज्ञान आहे. मॉविन गुदिन्हो, विश्‍वजित राणे, रोहन खंवटे, विजय सरदेसाई हे मंत्री हुशार असून मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत व्यवस्थितपणे कारभार सांभाळत असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.