पर्तगाळी हमरस्त्यावर गॅसवाहू टँकर उलटून एक ठार

पर्तगाळी हमरस्त्यावर गॅसवाहू टँकर उलटून एक ठार

बेतोडा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस घेऊन जाणारा एमएच ४३ बीजी २४९७ हा गॅस वाहक टँकर मडगाव-कारवार हमरस्त्यावरील पर्तगाळ वळणावर कलंडून टँकरमधील चालक कवलेश यादव (५२) वर्षे टँकरखाली चिरडून जागीच ठार झाल. तर टँकरवरील क्लिनर दिलीपकूमार यादव बचावला आहे. दोन्ही व्यक्ती झारखंड येथील असून काणकोण पोलिस स्थानकावरील हवालदार तुळशिदास गावकर यांनी पंचनामा करून पुढील तपास चालू केला आहे.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्तगाळच्या धोकादायक वळणावर मातीत रूतल्यामुळे कलंडून हा टँकर उलटला. टँकरमध्ये गॅस भरलेला असून वास्को येथून कंपनीच्या अधिकार्‍यांना या संबंधीची सूचना देण्यात आली आहे. रात्रीपर्यंत गॅस भरलेला टँकर हलविला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. वर्षभरापूर्वी याच जागी भरलेला गॅस वाहक टँकर कोसळला होता.