पत्रपरिषदेसंदर्भात मानवी हक्क आयोगाची पोलिसांना नोटीस

सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला असलेल्या विरोधासंबंधी पत्रकारांना माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद बळाचा वापर करून बंद केल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन काल गोवा मानवी हक्क आयोगाने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून व वाळपईचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना नोटिसा जारी केल्या आहेत. ३१ जुलैपर्यंत नोटिसीला उत्तर द्यावे असे त्यांना कळवण्यात आले आहे.

दिव्यांग महिलेच्या
बदलीप्रकरणी नोटीस
दरम्यान, आयआयटी प्रकल्पाविरुद्धच्या मोहिमेला पाठिंबा व्यक्त केल्याप्रकरणी सूडबुद्धीने एक दिव्यांग महिला लता गावकर या सत्तरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकेची दक्षिण गोव्यात बदली करण्याची जी घटना घडली त्या प्रकरणी मानवी हक्क आयोगाने राज्याचे सचिव परिमल राय व महिला व बालविकास खात्याच्या सचिवांना नोटीस जारी केली आहे. ३१ जुलैपर्यंत नोटिसीला उत्तर द्यावे असे कळविण्यात आले आहे.