ब्रेकिंग न्यूज़

पणजी पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य

विधानसभेच्या पणजी पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले आहेत. येत्या १९ मे रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केले होते. निवडणूक कार्यालयाने पोट निवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल मंगळवारी केली. उमेदवारी अर्ज २ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मागे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आतांन्सियो (बाबूश) मोन्सेरात, भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर, आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक, अपक्ष अनिश बकाल, दिलीप घाडी आणि विजय मोरे यांचे अर्ज ग्राह्य ठरले आहेत.