ब्रेकिंग न्यूज़

पणजी पोटनिवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती

भाजपने येत्या १९ मे रोजी होणार्‍या पणजी पोट निवडणुकीसाठी खास रणनीती तयार केली आहे. भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी यांना प्रचार कार्यासाठी मतदान केंद्रांची जबाबदारी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी घेण्यात आलेल्या खास बैठकीत पोट निवडणुकीच्या खास रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पणजी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या विजयासाठी भाजपची पूर्ण ताकद उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.