ब्रेकिंग न्यूज़

पणजी पोटनिवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात

>> भाजप, कॉंग्रेस, गोसुमं व आपमध्ये चुरस

>> उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर भर

गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार अनिश बकाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पणजी पोट निवडणुकीसाठी भाजप, कॉंग्रेस, गोसुमं व आपच्या उमेदवारांमध्ये चुरशीची चौरंगी लढत होणार आहे.

पणजी पोट निवडणुकीसाठी भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, कॉंग्रेसचे बाबुश मोन्सेर्रात, गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर, आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक, अपक्ष दिलीप घाडी आणि विजय मोरे निवडणूक रिंगणात आहेत.

भाजपची प्रतिष्ठा पणाला
प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. पणजी मतदारसंघात प्रचाराच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. भाजपचे कुंकळ्येकर यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.

भाजपने पणजीतील पोट निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनविला आहे. पोट निवडणूक प्रचारासाठी खास रणनीती तयार केली आहे. यात मंत्री, आमदार आणि भाजपच्या नेत्यांकडे मतदान केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रचारात सहभागी होत आहेत.

कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेर्रात यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराला सुरुवात केली. आता घरोघरी जाऊन प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे. मोन्सेर्रात यांच्या निवडणूक प्रचारात विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर कॉंग्रेस नेते सहभागी होत आहेत.
गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना अभिवादन करून निवडणूक प्रचाराला गुरुवारपासून प्रारंभ केला आहे. मिरामार येथील बांदोडकर यांच्या समाधीस्थळाची गेट बंद असल्याने गेटीवरून आतमध्ये प्रवेश करावा लागला. बांदोडकर यांचे समाधीस्थळ बंदिस्त करण्यात आल्याबद्दल वेलिंगकर यांनी नाराजी व्यक्त केली. समाधीस्थळ खुले ठेवण्याची मागणी वेलिंगकर यांनी केली. आपचे वाल्मिकी नाईक यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.

एकूण २२,४८२ मतदार
पणजी मतदारसंघात एकूण २२,४८२ मतदार आहेत. त्यात १०६९७ पुरुष आणि ११७८५ महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात ३० मतदान केंद्रे आहेत.

यश निश्‍चित मिळेल!
पणजी पोट निवडणूक मोठे आव्हान आहे. आपण या निवडणुकीकडे गंभीरपणे पाहत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर होणार्‍या निवडणुकीत त्यांची उणीव भासत आहे. तथापि, त्यांचे आशीर्वाद आणि संघटन कौशल्याच्या जोरावर आणि सुज्ञ मतदारांच्या पाठिंब्यामुळे यश निश्‍चित मिळेल.
– सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजप

माझ्यासाठी मोठी परीक्षा
पणजी पोट निवडणूक ही माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे. ताळगाव पंचायत निवडणुकीत विजयामुळे विश्वास वाढला आहे. आपल्या विरोधात करण्यात येणार्‍या अपप्रचाराला पणजीतील मतदार बळी पडणार नाहीत.
– बाबुश मोन्सेर्रात, कॉंग्रेस

राजकारण शुद्ध करणार
राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. भाजप आणि मोन्सेर्रात यांच्यातील सेटिंगचे राजकारण बंद करण्यासाठी पणजीतील मतदार गोसुमंला पाठिंबा