पणजीच्या विकासासाठीच निवडणूक रिंगणात : मोन्सेर्रात

पणजी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण पणजीच्या पोटनिवडणुकीत उतरलो असल्याचे काल कॉंग्रेस उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांनी सांगितले. आपण पणजीचा विकास करणार असून तो सर्वसमावेशक असा असेल, असे ते पुढे म्हणाले.

आपल्या निवडणूक जाहिरनाम्यावरून नजर फिरवल्यास लोकांना ते कळून चुकणार आहे. विरोधात असलेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांपैकी तुमचा लढा हा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराशी आहे असे विचारले असता सगळ्यांशी असल्याचे त्यांनी सांगितले. आपण कोणत्याही उमेदवाराला कधी कमी समजत नसल्याचे ते म्हणाले. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येंकर, गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर, आपचे उमेदवार वाल्मिकी नाईक अशा सर्वच जणांशी आपणाला लढा द्यावा लागणार असल्याचे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले.