पक्षांतराच्या घटना लोकशाहीला धरून आहेत काय? ः सुदिन

राज्यपाल डॉ. मुदुला सिन्हा यांनी आपल्या अभिभाषणामध्ये लोकशाही मजबूत करण्याचा संदेश दिलेला आहे. तथापि, राज्यात मागील पंधरा दिवसात किंवा त्यापूर्वी घडलेल्या राजकीय पातळीवरील पक्षांतराच्या घटना लोकशाहीला धरून आहेत का? असा प्रश्‍न माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर बोलताना काल उपस्थित केला. राज्यपाल डॉ. सिन्हा यांनी लोकशाही मजबूत करण्यावर भर दिलेला असून सर्वांना योग्य निर्देश दिलेला आहे.