ब्रेकिंग न्यूज़

पं. पिळगावकर संगीत संमेलन २४ नोव्हेंबर रोजी

थिवी (न. वा.)
पं. वामनराव पिळगावकर शिष्य हितचिंतक परिवारतर्फे वार्षिक सभा राष्ट्रोळी साईबाबा देवस्थान मरड सांगोल्डा येथे पार पडली. सुरूवातीला सचिव ऍड. कमलेश शेटगावकर यानी अहवाल सादर केला. महाबळेश्‍वर च्यारी यांनी स्वागत केले. बैठकीत २४ व २५ नोव्हेंबर रोजी पं. वामनराव संगीत संमेलन घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. बैठकीला गोरख मांद्रेकर, गणेश पार्सेकर, महाबळेश्‍वर च्यारी, संतोष चोडणकर, शामप्रसाद पार्सेकर, प्रसाद मांद्रेकर, पांडुरंग शिरोडकर, संदीप कामुलकर आदी उपस्थित होते.