ब्रेकिंग न्यूज़

पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्गात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज सोमवार दि. १३ रोजी दुपारी ठीक १२ वाजता सिंधुदुर्गात कासार्डे (कणकवली) येथे होणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान सिंधुदुर्गात येत आहेत. ते भाजपा उमेदवारांकरिता प्रचारसभा घेऊन उंडील येथिल त्यांचे गुरु अनंत काळे यांच्या परिवाराकडून सत्कार स्वीकारणार आहेत. मोदी पंतप्रधान झाले की, त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेऊन येणार, असे वचन आपण दिले होते. या प्रचारसभेच्या निमित्ताने आपण ही वचनपूर्ती केली असल्याचे भाजपचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

Leave a Reply