न्यूड पार्टी पोस्टर प्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

गोवा पोलिसांनी न्यूड पार्टी पोस्टर प्रकरणी अटक केलेल्या अरमान मेहता (३०, बिहार) याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. संशयित अरमान याचा न्यूड पार्टीच्या पोस्टरची जाहिरातबाजी करून सर्वत्र खळबळ निर्माण करून संभाव्य ग्राहकांची लुबाडणूक करण्याचा विचार होता, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

गोवा पोलिसांनी या प्रकरणी कसून तपासकाम करून संशयित अरमान मेहता याला बिहार येथून ताब्यात घेऊन सोमवारी गोव्यात आणले. वेश्या व्यवसायात प्रकरणी अरमान मेहता याची चौकशी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संशयित अरमान याने ऑक्टोबर २०१८ मध्ये गोव्यात वास्तव्य केले होते. न्यूड पार्टीचा पोस्टर व्हायरल झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात देश आणि विदेशातून कॉल्स येऊ लागले. त्यामुळे त्याने आपला मोबाईल फोन बंद करून पोलिसांना चकवत होता. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी संशयित अरमान याची कसून चौकशी केली जात आहे.