ब्रेकिंग न्यूज़

नीरव मोदीला तिसर्‍यांदा जामीन नाकारला

भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांना गंडवून विदेशात पळून गेलेल्या नीरव मोदी याला काल येथील न्यायालयाने तिसर्‍यांदा जामीन नाकारला. जामीन अर्जावरील कालच्या सुनावणीवेळी ४८ वर्षीय नीरव मोदी उपस्थित होता. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने मुख्य न्यायदंडाधिकारी एम्मा आरबथनॉट यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी नीरव येथील आपल्या फ्लॅटमध्ये २४ तास उपलब्ध राहील. तसेच सुरक्षा अनामत रक्कम म्हणून २० लाख पौंड भरण्याची तयारी असल्याचे नीरव मोदीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. तरीही न्यायाधीशांनी जामीनास नकार दिला. भारत सरकारच्या वकिलांनीही नीरव मोदीला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली.