निवडणूक आचार संहिता अद्यापही जैसे थे

>> शिथिल होण्याच्या प्रतीक्षेत सरकार

 

विधानसभा निवडणुकीसाठी लागू केलेली निवडणूक आचार संहिता निवडणूक आयोगाने आयोगाने अद्याप शिथिल केलेली नाही. पार्श्‍वभूमीवर सरकार आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहे.
आचारसंहिता मतदारसंघ प्रभाव पाडू नये यासाठीच लागू केलेली असते. निवडणुका झालेल्या असताना ती जारी ठेवण्याची गरज नाही. आचार संहितामुळे अनेक विकासकामे पडून राहिली आहेत. रस्त्यांच्या कामाचे आदेश, तसेच वेगवेगळ्या कामांच्या निविदा जारी करणे शक्य होत नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. येत्या ११ मार्च रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर पुढील दिवसात पंचायत निवडणुकांची आचार संहिता लागू होईल, असे ते म्हणाले.
या काळात ग्रामीण भागातील कामेही करणे शक्य होणार नाही. पावसाळ्यापूर्वीच्या कामांवर परिणाम झाल्याने त्याचा जनतेला त्रास होईल, असे पार्सेकर यांचे म्हणणे आहे. निवडणूक आचार संहितमुळे प्रत्येक कामासाठी निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवावी लागते व त्यासाठी बराच वेळ वाया जातो, त्यामुळेच आचारसंहिता शिथिल करावी, अशी सरकारची मागणी आहे.