नवीन ३७ कोरोना पॉझिटिव्ह

>> मांगूर हिलमध्ये नवे १७ बाधित, रुग्णसंख्या ५४४

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह ३७ नवीन रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ५४४ वर पोहोचली आहे. मांगूर हिलमध्ये आणखी १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून मांगूर हिलाशी संबंधित आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कुडतरी, राय, चिंबल, बायणा, सडा – वास्को येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६२९ एवढी झाली असून त्यातील ८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. परराज्यातून आलेले ८ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मडगाव – बेती येथे आणखीन १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.

कुडतरीमध्ये आणखीन ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून रुग्णाची संख्या ४ झाली आहे. राय येथेही आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

चिंबल येथे आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून चिंबलमधील कोरोना रुग्णांची संख्या १४ झाली आहे.
बायणा आणि सडा वास्को येथे आणखी प्रत्येक ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बायणा येथील रुग्णांची संख्या २४ तर, सडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० झाली आहे.
आरोग्य खात्याने १६७५ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेतून १३४३ नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १३०६ नमुने निगेटिव्ह आहेत. ३७ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर, ६४२ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

गोमेकॉत १२ संशयित दाखल
जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित १२ रुग्णांना दाखल करण्यात आले असून कोरोना वॉर्डात कोरोना संशयित १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.