ब्रेकिंग न्यूज़

नदाल चॅम्पियन

चार तास ५० मिनिटे रंगलेल्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे १९ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. नदालने २७व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यापूर्वी नदालने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये युएस ओपन स्पर्धा जिंकली आहे तर पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा डॅनिल मेदवेदेव हा २००५ नंतरचा रशियाचा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला होता. याआधी मराट सॅफिनने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.