नगरसेवक डिसोझा यांचे कोरोनामुळे निधन

मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक पास्कोल डिसोझा (७२) यांचे शनिवारी मध्यरात्री मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले. संध्याकाळी वास्कोत सेंट ऍन्ड्र्यू चर्च दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू जुझे फिलिप डिसोझा व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.