ब्रेकिंग न्यूज़

नगरनियोजन मंडळाची बैठक पुन्हा स्थगित

पणजी (प्रतिनिधी)
नगरनियोजन मंडळाची काल बुधवारी आयोजित बैठक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. नगरनियोजन मंडळाची ऑगस्ट महिन्यात आयोजित बैठक काही कारणास्तव स्थगित करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात ही बैठक पहिल्यांदा स्थगित करण्यात आली. या बैठकीत कळंगुट – कांदोळी बाह्य विकास आराखडे, जमीन रूपांतराचे दर, ओडीपी नवीन नियम आदी विषय चर्चेसाठी होते.